Share

पंजाबविरुद्धच्या सामन्यात ‘या’ चुकांमूळे झाला राजस्थानचा पराभव

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाचा आखेरच्या चेंडुवर चार धावांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या बलाढ्य धावसंख्येपुढे राजस्थान रॉयल्सने जोरदार लढत देत सामना खेचून आणला. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार सॅमसन हा बाद झाला. मात्र या सामन्याच्या पहिल्या डावात राजस्थान संघाने काही चुका केल्याने त्यांचा पराभव झाला.

पहिल्या डावात पंजाब किंग्सकडून कर्णधार के एल राहुलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी साकारली. मात्र राहुलला राजस्थानच्या संघाने दोन वेळेस जिवदान दिले. श्रेयस गोपाल टाकत असलेल्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडुवर बेन स्टोक्सने राहुलचा सोपा झेल सोडला. त्यावेळी राहुल केवळ १५ धावांवर खेळत होता. तर मुस्तफिझुर रेहमानच्या १५व्या षटकात जोस बटलरने राहुलला दुसऱ्यांदा जिवदान दिले. यावेळी राहुल ५४ धावांवर खेळत होता.

तर राहुल तेवतीया टाकत असलेल्या नवव्या षटकात पाचव्या चेंडुवर तेवतीयाला स्वत:च्या गोलंदाजीवर ख्रिस गेलचा झेल पकडण्याची संधी आली होती. यावेळी गेल हा ३३ धावांवर खेळत होता. या जिवदानामुळे पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्स संघापुढे २२२ धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्यातील आखेरच्या चेंडुवर पंजाबच्या संघाने ४ धावांनी निसटता विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!