Share

विराट कोहलीला १०० व्या सामन्यासाठी ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव

Published On: 

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध आज आपल्या कारकिर्दीतील १०० वा  कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याअगोदर विराटला सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला १०० व्या कसोटी सामन्याची कॅप देऊन त्याला सन्मानित केले.

मोहाली कसोटीमध्ये उतरताच त्याचे नाव १०० कसोटी खेळणाऱ्या दिग्गजांच्या यादीत सामील झाले आहे. असा कारनामा करणारा तो भरताचा १२ वा खेळाडू ठरला आहे. त्याने हा १०० वा सामना खूप खास असल्याचे सांगितले आहे.

विराट च्या १०० व्या सामन्याबद्दल ट्विटर जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्यातच भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वसीम जाफर म्हणाला की, “विराट कोहली कसोटी क्रिकेटचे काळीज आहे. तो जोपर्यंत खेळेल तो पर्यंत ते धडकत राहील. त्यांनी विराटला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत”

आकाश चोपडानेही त्याला शुभेच्छा दिल्या तो म्हणाला, “विराटने कसोटी सामन्याला प्रथम प्राधान्य दिले. त्याचा हा सामना पाहण्यासाठी चाहते ही खूप उत्साहित आहेत.”

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!