Share

तुमचा ‘वाचवा’ हा शब्द ‘बुडवा’ शब्द होईल; भुजबळांचा फडणवीसांना खोचक टोला

Published On: 

मुंबई: ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणुका होता कामा नये. दरवेळेस तुम्ही आम्हाला सांगता, पण ओबीसींच्या आरक्षणावर ठोस कार्यवाही होत नाही. आमच्या समाधानासाठी मंत्रिमंडळाचे ठराव करू नका. ठराव करायचे असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवा. असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तुमचा ‘वाचवा’ हा शब्द ‘बुडवा’ शब्द होईल अशा खोचक शब्दांत फडणवीसांना टोला लागावला आहे.

यावेळी फडणवीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा असे म्हटले यावरच भुजबळ म्हणाले की, ” एकही झेडपी ओव्हरड्यू झाली नाही. फडणवीसांची तुम्ही दोघं तिघं आणि आमच्याकडे एक-दोन लोकं मिळून यासंदर्भात एकत्र काम करूयात. तसेच काही गोष्टी राहून गेल्या. त्या मी मान्य केल्या. टेक्निकल गोष्ट राहून गेल्या. मात्र आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी करणार नाही. आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ.”, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.

तसेच तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, भांडणं करण्याऐवजी एकत्र येऊया आणि हा विषय सोडवू. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं आमच्याकडे आहे. मात्र केवळ दुरावा निर्माण करण्याचा तुमचा वाचवा हा शब्द तो बुडवा हा शब्द होईल असं करू नका, अशा शब्दांत भुजबळ यांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!