Share

औरंगाबादच्या औद्योगिक नगरीत उद्योजकाला मारहाण, उद्योग संघटना आल्या एकत्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कंपनीतील कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांनी कंपनी मालकालाच मारहाण केल्याची घटना औरंगाबाद औद्योगिक नगरीत घडली आहे. या विरोधात आता सर्व उद्योजग एकत्र आले आहेत. उद्योजकांना वारंवार त्रास देणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या तथाकथित नेत्यांची यादीच मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भातील सिसिटीव्ही पुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारामुळे आपल्या उद्योग क्षेत्रात उद्योजक येण्याचा विचार करत नसल्याची खंत काही उद्योजकांनी व्यक्त केली आहे. परिसराचा विकास करायचा असेल आणि इथल्या नागरिकांना रोजगार द्यायचा असेल तर अशा घटना त्वरीत थांबायला हव्यात, असेही मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

या संदर्भात सर्व उद्योजकांनी एकत्र येत सरकार दरबारी याची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. राज्याचे उद्योग मंत्रीच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही करण्यात आली आहे. कामगारांवर खरेच अन्याय होत असेल तर त्यांनी नक्कीच पुढे यावे मात्र, त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करायला हवा, असे मतही मसिहाचे अध्यक्ष नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!