Share

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव आणि बादशाहचा म्युझिक व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…’ हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणे दोन वर्षांपूर्वी सुकमा येथील मुलगा सहदेव दिरदो याने त्याच्या शाळेत गायले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान होत असून या व्हिडिओची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेज पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला कि या व्हिडीओची दखल रॅपर बादशहाने घेतली आहे. बादशहा हा व्हिडीओ पाहून फारच प्रभावी झाला. तसेच त्याने हा व्हिडिओ गायलेल्या सहदेवला भेटण्यासाठी देखील बोलावले आहे. तसेच बादशाहने सहदेवसोबत गाणे करणार असल्याचे म्हंटले होते. त्यानुसार आता बादशाहने सहदेवचा म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CSbDNNSAaDd/?utm_source=ig_web_copy_link

बादशाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सहदेव, बादशाह, आस्था गिल आणि रिको दिसतं आहेत. या गाण्यात सहदेवला अभिनय करताना पाहता येणार आहे. हा व्हिडीओ आजच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी सहदेवची कौतुक केली आहे.

सुकमा येथे राहणाऱ्या सहदेवच्या घरात टीव्ही किंवा मोबाइल नाही. शिक्षकाच्या सांगण्यावरून सहदेवने हे गाणे रेकॉर्ड केले होते. सहदेवच्या गाण्याची जादू आज सोशल मीडियामध्ये सुरू आहे. त्याने आपल्या या शैलीने लाखो लोकांची मने चोरली आहेत. आजकाल हे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्राम रील्सही बनवत आहेत. मात्र आता बादशाहसोबत सहदेवचा म्युझिक व्हिडीओसमोर आल्याने पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!