मुंबई : केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. कालच्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सभ्य पण जहरी भाषेत टीका केली.
आमच्या घरावर किती माणसं आली मोजली नाही. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केले. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का? तुम्ही कुणीही माझं काही करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय अशा संतप्त भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्या.
शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? ऑगस्टला बीडीडी चाळींच्या कार्यक्रमात लाड साहेबांना ते बोलले होते महिलांवर हात टाकला तर…. मी सुद्धा असंच बोललो होतो. ते महाशय काय बोलले होते. सेनाभवनबाबत कोण जर अशी भाषा करत असेल तर त्याचं थोबाड फोडा. यावर गुन्हा दाखल करायला नको. योगीबाबत बोलले होते योगी आहे की ढोंगी याला चपलाने मारलं पाहिजे. काय केलं होतं त्यांनी? अमित शाह बाबत बोलले होते की, निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो असं विधानसभेच्या वेळी बोलले होते. माननीय पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं असे म्हणत इत्यादी प्रकारचे मुद्दे काढत शाब्दिक हल्ला केला.
अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असा सूचक इशारा देत राणे यांनी शिवसेनेवर आदी आरोप करत टीका केली.
काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.
दरम्यान, काल मंगळवारी अटक झाल्यानंतर महाडकडे जाताना नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिशा सालियनच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा मुलगा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात सहभागी होता. तेव्हा त्यांना अटक झाली नाही, मग मला का अटक केली जात आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता मी काहीच बोलणार नाही पण असं करणाऱ्यांवर आम्ही जरूर कारवाई करू, असा इशारा राणे यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय’; न्यायालयाच्या दिलास्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

