नवी दिल्ली: नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक आनंद व्यक्त करत त्याचे कौतुक करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण याने देखील ट्वीट करत नीरज चोप्रानेचे अभिनंदन केले आहे.
अभिनेता अक्षय कुमारने लिहिले की, हे गोल्ड आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मनापासून शुभेच्छा नीरज चोप्रा. तू त्या सर्व आनंदाच्या अश्रूसाठी जबाबदार आहे. शानदार, असे म्हणत नीरज चोप्राचे मनापासून कौतुक केले आहे.
It’s a GOLD ????Heartiest Congratulations @Neeraj_chopra1 on creating history. You’re responsible for a billion tears of joy! Well done #NeerajChopra! #Tokyo2020 pic.twitter.com/EQToUJ6j6C
— Akshay Kumar (@akshaykumar) August 7, 2021
तर अभिनेता अजय देवगण याने देखील ट्वीट करत लिहिले की, टोकियो ऑलिम्पिकमधील विजयासाठी अभिनंदन नीरज चोप्रा. तुला आणखी ताकद मिळो. तुझा तुझ्या आई वडिलांना आणि भारताला गर्व वाटतो, खूप दमदार आहे. याच बरोबर बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.
Congratulations Neeraj Chopra on your win at the Tokyo Olympics. More power to you! You’ve made your parents & India ???????? proud. Can’t tell you how happy I am. This is awesome ????#NeerajChopra #TokyoOlympics pic.twitter.com/mx45Otodwo
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 7, 2021
टोकियो आलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात रौप्य पदकाने झाली तर शेवट सुवर्ण पदकाने झाला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण सात पदकं जिंकली. भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारताची ऑलिम्पिकमधली आजवरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने 6 पदकं जिंकली होती. यामध्ये दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
- बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्यालाच; खंडपीठाचा हस्तक्षेपास नकार
- ‘आठ दिवसांत कोरोना काळातील बिले द्या, अन्यथा..’ आ. धस यांचा इशारा
- मी माझी स्थिती एकनाथ खडसेंसारखी होऊ देणार नाही-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

