🕒 1 min read
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला होता. याच घटनेनंतर मराठा क्रांतिपर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यात अग्रस्थानी असलेले औरंगाबाद चर्चेत होते. पाच वर्षांपूर्वी याच औरंगाबादच्या मातीत मराठा क्रांती मोर्चाचे रोपटे लावण्यात आले होते. या रोपट्यास ९ ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १९) खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या विशेष उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात काही मागण्यांना अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
या मागण्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चा ते सदस्य अभियान राबवणे, गावागावात जाऊन जनजागृती करणे, मराठा क्रांती मोर्चा सदस्यांनी राजकीय पक्षांना पाठिंबा देऊ नये, मराठा क्रांती मोर्चा चा वापर राजकीय पक्षाला करता येणार नाही, आलेल्या निधीचा हिशेब समाजाला देण्यात यावा, मराठा समाजासाठी तत्काळ वसतिगृह सुरू करण्यात यावे, मराठा क्रांती भवन साठी दोन एकर जागा देण्यात यावी, मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाजातील लोकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.
याबरोबरच हरहर मराठा घरघर मराठा उपक्रम, मराठा जनसंपर्क अभियान, मराठा क्रांती मोर्चाची शाखा स्थापन करणे, सारथी संस्थेसाठी उपकेंद्र मराठवाड्यात देण्यात यावे. मराठा आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना १० लाखांची मदत, सरकारी नोकरी देण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, मनोज गायके आदींची उपस्थिती होती. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला ‘मराठा क्रांती मोर्चा’ औरंगाबादेत काढण्यात आल्याने शहरास वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी जी जबाबदारी देतील, ती पार पाडण्याचं काम राणे साहेब करतील- नीलम राणे
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
- मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला राज्यभरात कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करणार-विनायक मेटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
