🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २४ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. १०२ व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला त्यावर आज बैठकीत चर्चा झाली. कायदा करूनही राज्य सरकार याबाबत काहीच पाऊल उचलत नाही. त्यामुळे बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला राज्यभरात कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले. ते म्हणाले, २ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. ७ किंवा ८ सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक घेणार आहोत. त्यानंतर गणपती विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात महामोर्चा काढला जाणार असल्याचा इशाराही मेटे यांनी दिला. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर मुंबईत महामोर्चा काढला जाईल, असेही मेटे यांनी सांगितले.
तसेच उद्या शुक्रवारी, दि. २० ऑगस्ट रोजी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी १० वाजता भेट घेणार आहोत. या भेटीवेळी आम्ही राज्य सरकार जाणिवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करणार असल्याचे मेटेंनी सांगितले. राज्यपालांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी जाब विचारावा आणि ओबीसी आयोग बरखास्त करावा अशी देखील मागणी मेटे करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
- मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा
- औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे आयटीआयला प्राधान्य!
- वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
