Share

नगरमध्ये केवळ कर्जत-जामखेडमध्येच ‘जलयुक्त’ची चौकशी, आता ते उघडे पडलेत; माजी मंत्री राम शिंदेचा घणाघात

Published On: 

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीकडून या योजनेत घोटाळा झाला नसल्याचा अहवाल राज्य सरकारला दिल्याचं सांगण्यात आलं. यावर भाजप नेते तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आम्ही सुरवातीपासूनच आम्ही सांगत होतो, की ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. सर्व गोष्टी तपासूनच ती आखण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उचांवण्यासाठी ही योजना फायद्याची ठरणारी असल्याचे आम्ही सांगत होतो. चौकशीत शेवटी तेच आढळून आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कायमचा दिलासा देण्याचा आमचा उद्देश होता. तो यशस्वीही झाला. पण, सध्याच्या सरकारने त्यावरून आमची कोंडी करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. नगर जिल्ह्यात या योजनेची चौकशी केवळ आपला मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्येच करण्यात आली. यामागेही संबंधितांचे राजकारण होते. आता ती चौकशी करायला भाग पाडणारेही यातून उघडे पडले आहेत,’ असे राम शिंदे म्हणाले.

तसेच ‘ महाविकास आघाडी सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली. खुली चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातून दोष तर आढळून आले नाहीतच उलट या योजनेचे फायदेच पुढे आले. त्यामुळे समितीने योजनेचे कौतूक केले आहे. एखाद्या योजनेची चौकशी व्हावी आणि त्यातून दोष किंवा त्रुटींऐवजी फायदेच समोर यावेत, त्यावरून समितीला त्या योजनेचे कौतूक करण्याची वेळ यावी, असे पहिल्यांदाच घडले आहे, असं शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!