Share

शहरात वाहनचोरांनी काढले डोके वर, चौघांच्या दुचाकी लांबवल्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वाहन चोरांनी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महानुभाव आश्रम चौक, गरमपाणी, भोईवाडा आणि पुंडलिकनगर या भागातून चोरांनी दुचाकी चार दुचाकी लांबवल्या. त्यात एका चोराने रुग्णालयातील टेक्निशीयनची दुचाकी लांबवत तिची तोडफोड केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

पहिली घटना महानुभाव आश्रम चौकातील कृष्ण मंदिराजवळ ५ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. श्रीपाद शशीकांतराव धोकटे (५२, रा. ज्ञानेश्वरनगर, सातारा परिसर) यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास मंदिराजवळ दुचाकी (एमएच-२०-बीडी-०६४९) उभी केली होती. मध्यरात्री चोराने त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना भोईवाडा भागात २ एप्रिल रोजी पहाटे घडली. शेख इरफान शेख तामिजोद्दीन (२५, रा. ईमामवाडा, ता. खुलताबाद) हा हमाली काम करतो. त्याने भोईवाडा भागात पहाटे तीनच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-डीएच-८८६५) उभी केली होती. चोराने संधी साधून हँडल लॉक तोडत त्याची दुचाकी लांबवली.

तर प्रदीप वसंत भदरगे (३७, रा. प्रकाशनगर, गरमपाणी) हे एका रुग्णालयात टेक्निशीयन आहेत. १० एप्रिल रोजी त्यांनी सकाळी घरासमोर दुचाकी उभी केली होती. चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबवली. त्यानंतर ही दुचाकी क्रांतीचौकातील संसारनगरातील एका गॅरेजमध्ये तोडण्यात येत होती. दुचाकीचा (एमएच-२०-ईव्ही-४८७७) शोध सुरू असताना हा प्रकार भदरगे यांच्या निदर्शनास आला. त्यावरुन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच राहुल ज्ञानेश्वर सपकाळ (२८, रा. गजानननगर, गारखेडा परिसर) याने ९ एप्रिल रोजी घरासमोर दुचाकी उभी केली होती. त्याची दुचाकी (एमएच-२०-एफआर-०३७६) चोराने हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!