Share

कोट्यावधीच्या जागेवरील अनधिकृत व्यापारी संकुल प्रकरणी जि.प. सदस्य आक्रमक

Published On: 

नांदेड : जिल्हा परिषदेची शुक्रवारी पार पडलेली सर्वासाधारण सभा ही अतिक्रमणाच्या मुद्यामुळे चांगलीच गाजली. यावेळी तरोडा येथील अतिक्रमण प्रकरणावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी केली. या मागणीनंतर सभापती संजय बेळगे यांनी चार दिवसात याबाबत फिर्याद देऊ असे म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टीकरणानंतर मालकीचा फलक लावुनही जिल्हा परिषदेच्या कोट्यावधीच्या जागेवर टोलोजंग व्यापारी संकुल उभारण्यात आले. मात्र याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. येथील गाळा ६० लाखांत विकला जात आहे तसेच एका रात्रीत अनधिकृत बांधकाम होत आहे. यावर प्रशासन मुग गिळून गप्प का? याप्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.

सदस्यांच्या आक्रमक मागणीमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी , ‘या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आसून , मी स्वत: या प्रकरणाची कागदपत्रे मागवून चर्चा करेन’ असे सांगितले. तर बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी या प्रकरणी आपण चार दिवसांत फिर्याद देणार आहोत. असे अश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!