नांदेड : मागील सात वर्षांत केंद्र सरकारने देश विकायला काढला आहे. त्या संदर्भाने जागरूकता निर्माण करावी या उद्देशातूनच ‘व्यर्थ न हो बलिदान चलो बचाए संविधान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड येथे दिली. व्यासपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख आदींची उपस्थिती होती.
माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, नांदेडमधील राज्यातील हा दहावा कार्यक्रम आहे. भारताच्या स्वातंत्र्यातील सहभागी वीरांना, त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित करणे हा मूळ उद्देश आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास आणि त्यात काँग्रेसचा सहभाग हा नव्या पिढीला सांगण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतीय जनता पार्टीने मागील सात वर्षांत देश विकायला काढला आहे. त्यामुळे तयार झालेली परिस्थिती विशेष करून भारतीय अर्थव्यवस्थेचा बिघडलेला तक्ता नवीन पिढीला सांगण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे नाना पटोले म्हणाले. यावेळी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला
काँग्रेसच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळेच पक्षातर्फे संघटना बांधणीचे काम सुरू आहे. राज्यात आगामी काळात काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष बनणार आहे. त्यावेळी कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे मत या पटोले यांनी यावेळी व्यक्त केले. प्रसारमाध्यमे, न्यायालय, सीबीआय, ईडी यासह अनेक संस्थांवर मोदी सरकार बंधने आणू पाहत आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून याबाबत युवा नेते राहुल गांधी यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय’; न्यायालयाच्या दिलास्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

