Share

औरंगाबाद ग्रामीणमध्ये लसीकरणाची कमान आता सरपंचांच्या खांद्यावर; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय कमी झालेल्या लसीकरणामुळे पंतप्रधानांकडून आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्यासाठी सरपंचांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना निधी देणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद शहर महत्त्वाचे आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण व्हायला हवे अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे नो लस नो पेट्रोल, रेशन आदी उपक्रम राबवले जात आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन जिल्हाधिकारी जनजागृती करत आहेत.

गल्ले बोरगाव, वेरूळ, तलाववाडी, शुलीभंजन, कागजीपुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडल्या. लसीकरणाच्या कामात दुर्लक्ष केल्यामुळे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन आणि सिद्धनाथ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी निलंबनाची कारवाई केली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!