नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी आपण भारतातच असून येत्या ४८ तासांत सीबीआयसमोर हजर होण्यास तयार असल्याचे सिंह यांनी न्यायालयात सांगितले. तद्पश्चात न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये सुरू असलेला वादावर चिंता व्यक्त केली आहे.
याप्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई अधिक उत्सुकतेची बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. परमबीर सिंह आणि संजय पांडे यांच्यात झालेल्या संवादावर देखील सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. पोलिस आयुक्त अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे,असेही न्यायालयाने यावेळी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत हे समजल्याशिवाय खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही असे म्हटले होते. तसेच परमबीर सिंह फरार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली असून यावेळी परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आले नाहीत, असे न्यायालयात सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील
- ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातय’
- ‘सीएए, एनआरसी मागे घ्या नाहीतर…’, ओवैसींचा मोदी सरकारला इशारा
- विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती
- खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

