मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Samir Wankhede) यांचा एक मौलवीसोबतचा फोटो ट्विट केला आहे. वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा मलिकांनी करत कबूल है, कबूल है, कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? असा प्रश्न केला आहे. त्यावर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी समीर वानखेडे यांचा पूजा करतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. तसेच आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो, असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1462609325533188096
नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर खोट्या पद्धतीने आरक्षण घेऊन IRS मध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. मात्र आता ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असं वानखेडे कुटुंबीयांचे म्हणणं आहे. हे प्रकरण आता कोर्टात गेले असून विविध पुरावे सादर केले जात आहेत.
दरम्यान, आज नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांचा पहिल्या निकहाचा फोटो ट्विट केला आहे. त्यात वानखडे सही करताना दिसत आहेत. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आज नवाब मलिक यांच्या विरोधात न्यानदेव वानखडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. तर, वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळेचे दाखलेही ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- यशोमती ठाकूर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस जबाबदार नेते आहेत, पण….
- मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित
- एसटी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता; परिवहन मंत्र्यांची ‘पॉवर फुल’ बैठक
- …तोपर्यंत त्यांना पोलिस दलात घेऊ नका; किरीट सोमय्या यांचा विश्वास नांगरे पटलांवर गंभीर आरोप
- हे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार आहे- सुधीर मुनगंटीवार


