Share

कर्जाच्या हप्त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पतधोरण जाहीर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण आढावा बैठकीनंतर पतधोरणाची घोषणा केलीय. रिझर्व्ह बँकेच्या वतीने कर्जदारांना मोठा दिलासा देत रेपो दरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्जदारांचा हप्ता वाढणार नाही. कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी रेपो दरात बदल करण्यात आलेला नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर आहे. एप्रिल महिन्यामध्ये महागाई दर ४.३ टक्के इतका राहिला असल्याची माहिती देखील दास यांनी दिली. यंदा चांगला मान्सून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लवकरच रिकव्हरी होण्याची शक्यता देखील दास यांनी व्यक्त केली. जोपर्यंत कोरोना महामारीचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत पतधोरणाबाबत रिझर्व बँकेच्या वतीने ‘उदार’ धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे देखील, पतधोरण आढावा समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

भारतीय रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२१-२०२२ साठी जीडीपी वाढीचा अंदाज कमी करण्यात आला आहे. पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या वतीने १०.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता तो ९.५ टक्के करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर निर्यात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिरता येणे शक्य असल्याचे मत देखील दास यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!