चंदिगढ : शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे काळे तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. तरीही सरकारने अद्याप मागण्या न केल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. याचे पडसाद पंजाबमधील मलोट शहरात एका पत्रकार परिषदेत दिसले.
शनिवारी २७ मार्च रोजी पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजप आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. शिवाय त्यांच्या तोंडाला काळंही फासलं. अरुण नारंग हे पंजाबच्या अबोहर येथील आमदार आहेत.
आमदार नारंग हे राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. पण ते येण्याच्या आधीपासूनच शेतकरी तिथे त्यांची वाट पाहत बसले होते. नारंग पोहोचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती जमा झाले.
त्यांनी नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले. तसंच त्यांच्या तोंडाला काळं फासलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर काढले.
महत्वाच्या बातम्या
- सीरमच्या आणखी एका लसीची चाचणी सुरु ‘या’ महिन्यात लस येण्याची शक्यता
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


