नवी दिल्ली: भारतात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत जात असताना दुसऱ्या बाजुला कोरोना लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम देखील सुरु आहे. यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटची कोव्हीशिल्ड आणि हैदराबाद येथील कोव्ह्क्सीन या दोन लसींद्वारे लसीकरण सुरु आहे. त्यानंतर कोरोनाच्या लढ्यात देशाला आणखी बळ मिळणार आहे. सीरम इन्स्टीट्युटने आणखी एक लस आणली जाणार आहे. कोवोव्हॅक्स या कोरोनाच्या लशीची भारतात चाचणी सुरू झाली आहे.
सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदार पुनावाला यांनी दिली आहे. आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोवोव्हॅक्स लशीच्या चाचणीची माहिती दिली आहे. या लशीची आफ्रिकन आणि आशियन प्रकारच्या कोरोना विषाणुवर चाचणी करण्यात आली आहे. ही लस ८९ टक्के कार्यक्षम आढळून आल्याचे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Covovax trials finally begin in India; the vaccine is made through a partnership with @Novavax and @SerumInstIndia. It has been tested against African and UK variants of #COVID19 and has an overall efficacy of 89%. Hope to launch by September 2021! https://t.co/GyV6AQZWdV
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) March 27, 2021
अमेरिकेची लस कंपनी नोवॅवॅक्स कंपनीने सीरमबरोबर एनव्हीएक-कोव्ह२३७३ या कोरोना लशीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या भारतासह इतर देशांमध्ये वापरण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो…’
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


