Share

पुण्यात शिवसेना किंग किंवा किंगमेकरची भूमिका बजावणार – संजय राऊत

Published On: 

पुणे – राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली असून स्थानिक स्तरासह राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत कायमच उत्सुकता असते.

राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने एकत्र येत निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. पुण्यात शिवसेना भवन येथे आयोजित शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यात होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास शिवसेना 80 जागा लढवणार आहे. तसेच यंदा पुण्यात शिवसेना किंग किंवा किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे अस मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांनी  खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिला असतानाच २०२४ च्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून काँग्रेस सत्तेत येईल यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!