Share

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी कोसळले ते कळणारही नाही’

Published On: 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या मुद्द्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरताना दिसत आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळले आणि तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. त्याबाबत विचारलं असता दरेकर यांनी ही कोटी करत दावा केला. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही टीका केली आहे. कोरोना लसीकरणाबाबत काढण्यात आलेले ग्लोबल टेंडर रद्द झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का? असा प्रश्न करतानाच निविदा प्रक्रियाते चांगल्या कंपन्या येणे अपेक्षित होते, असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!