बीड: जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याच्या हद्दीतील रस्त्यांचे काम रखडल्याने कोविड रुग्णांचे जीव गेले आहेत, या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित गुत्तेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी रात्री उशिरा उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस शिरूरकासार पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. त्यामुळे संबंधित यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
आमदार सुरेश धस यांनी कोरोना महामारीचा संदर्भाने १० मे रोजी बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली हाती. याच बैठकीत रस्त्याच्या रखडलेल्या कामा मुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे संबंधित गुत्तेदार यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची सूचना आमदार धस यांनी तहसीलदार बेंडे यांना दिली होती. मात्र, गुन्हे दाखल न झाल्याने आमदार सुरेश धस यांनीच आपल्या समर्थकांसह गुरुवारी रात्री साडेदहा वाजता शिरूरकासार पोलीस ठाणे गाठले व गुत्तेदाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दिली.
शिरूर तालुक्यामध्ये कोविड रुग्णांची आणि बालक रुग्णाची वाढती संख्या असून शिरूर तालुक्यातील इतर गावातून शिरूर या गावाकडे ये – जा करण्यासाठी असलेला चिंचपूर ते राजुरी आणि झापेवाडी ते मोरेवस्ती हे रस्ते चांगल्या अवस्थेत राहिलेले नाहीत. या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वेळेवर उपचारासाठी पोहोचू न शकलेल्या अनेक रुग्णाना जीव गमवावा लागला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून सुरेश धस प्रशासनाला सांगत आहेत मात्र प्रशासन कारवाई करत नसल्याने अखेर धस यांनीच तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि गुन्हा नेांद केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?’, दरेकरांचा सवाल
- ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्न पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
- टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये आयोजित केला जाईल ; पीसीबी अध्यक्षाचा दावा
- अमेरिकेने लसीच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, भारतात लसींचे उत्पादन वाढणार
- शिवराज्यभिषेक दिनी शासकीय कार्यालयात भगवा ध्वज उभारण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

