मुंबई : राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने राज्यातील सर्व थिएटर आणि चित्रीकरण पूर्णपणे बंद करकरण्यात आले. या महामारीचा सर्वच क्षेत्राला आर्थिक फटका बसला मनोरंजन क्षेत्रातील आगामी चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम होत आहे. यासाठी अनेक निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले. यातच आता ‘हंगामा २’ हा कॉमेडी चित्रपटाचीही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
SCOOP: #Priyadarshan's #Hungama2 sold to @DisneyplusHSVIP for Rs. 30 crores@priyadarshandir https://t.co/BmS53Mg53e
— BollyHungama (@Bollyhungama) June 2, 2021
बॉलिवूडचा आगामी चित्रपट ‘हंगामा’चे अधिकृत हक्क डिस्ने प्लस आणि हॉटस्टारला ३० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाइट हक्कांचा कोणत्याही पद्धतीने समावेश नाही. शिवाय टीव्ही प्रिमियरच्या हक्कांची एकूण रक्कम अद्याप समजू शकलेली नाही आहे. मात्र ही रक्कम अंदाजे ३६ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. ‘हंगामा २′ ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार आहे, हे देखील अजून समजू शकलेले नाही.
Hungama-2 Rights Sold To Disney+ Hotstar For Rs 30 Cr, Starring Paresh Rawal, Shilpa Shetty #HUNGAMA2 #disneyplushotstar #PareshRawal #ShilpaShettyhttps://t.co/dkZOvAIoLe
— Global Tribune (@GTribuneNews) June 4, 2021
‘हंगामा २′ हा एक हलकीफुलकी कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहून एन्जॉय करता येईल असा आहे.या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल, आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि टिकू तलसानिया या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात परेश रावल आणि शिल्पा शेट्टीची ही जोडी बघायला मिळणार आहे. तसेच या कलाकारांव्यतिरिक्त अक्षय खन्नाही छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ट्वीटरने केली मोहन भागवत यांच्यावर कारवाई ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ‘गंगेतील मृतदेहांची चर्चा झाली, पण बीडच्या २२ मृतदेहांच्या विटंबनेवर शांत का?’
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

