पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
‘पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल,’ अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे केवळ त्यावष्य सेवांची दुकाने सुरु राहणार असून इतर सर्व दुकाने बंद राहतील. तर, हॉटेल व रेस्टोरंट, बार, फूड कोर्ट हे बसून(Dine-In) खाण्या-पिण्यासाठी बंद राहतील. मात्र, पार्सल सेवा सुरु राहणार आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार !
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 18, 2021
पुणे शहरात आज किती रुग्ण ?
आज (दि. १८ जून) २८० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील ३१८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४ हजार २०३ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ६५८ रुग्णांपैकी ४०९ रुग्ण गंभीर तर ६११ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’
- भाजपत अंतर्गत कलह! पक्षातील नेत्याकडूनच तब्बल २१ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- पुण्यात आज ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

