Share

पुणे शहरात आज २२२ रुग्णांनी केली कोरोनावर मात, तर ‘इतक्या’ नव्या कोरोना बाधितांची भर

Published On: 

पुणे : पुणे शहरातील निर्बंध कमी करण्यात आले असले तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक ठेवण्यास प्रशासन कटाक्षाने काम करत आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी पुण्यात सध्या १५० ते २०० हुन अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोना मुक्तांचे प्रमाण देखील कमी जास्त होत असून कोरोनाचा धोका हा कायम आहे.

दरम्यान, आज पुणे शहरात नव्याने १९७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९१ हजार ८६२ इतकी झाली आहे. तर २२२ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८० हजार ९०० झाली आहे.

आज एकाच दिवसात ७६१९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ६२ हजार २४३ इतकी झाली आहे. यासोबतच, सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०७७ रुग्णांपैकी २०९ रुग्ण गंभीर तर २४८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८८५ इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!