औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ 1.45 टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरित निधी आंध्रप्रदेश आणि तेलंगणात दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरणासह नव्या रेल्वे मार्गांसाठी खर्च होणार आहे. त्यामुळे दमरेकडून मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरुच असल्याने रेल्वे संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अर्थसंकल्पातून मिळणार्या निधीतून दमरेने मराठवाड्याचा किंचीतसा देखील विचार केलेला नाही. मराठवाड्यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केल्या जाणार्या मनमाड-परभणी मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबाद-दौलताबाद – चाळीसगाव मार्ग, रोटेगाव-कोपरगाव मार्ग, जालना-खामगाव मार्ग, पूर्णा येथे लोको शेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड येथे बायपास लाईन, औरंगाबादेत पीटलाईन या मागण्यांचा विचारच करण्यात आला नाही.
दक्षिण मध्य रेल्वेला मिळालेल्या एकूण निधीपैकी फक्त 1.45 टक्के निधी मराठवाड्यात यावर्षी खर्च होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले. संपूर्ण झोनमध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा एकदा मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी ! अशोक चव्हाणांची केंद्राला गळ
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

