औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये भूमिगत गटार योजना,साठी औरंगाबादला ‘ओडीएफ ++’ (ODF ++) हे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही शहराला त्याचा फायदा होऊ शकतो. स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा समावेश पहिल्या दहा क्रमांकामध्ये असावा या दृष्टीने मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी नियोजन करत विविध उपक्रम राबवून प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारतर्फे नियुक्त संस्थेने १२ ते १५ जानेवारी या दोन दिवसांमध्ये शहरातील ५३ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये दिवसाच्या वेळांप्रमाणेच मध्यरात्री आणि पहाटे तपासणी करण्यात आली. या पाहणीचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला असून, त्यात औरंगाबाद महापालिकेला ‘ओडीएफ ++’ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील ‘स्टार रेटिंग’ आणि सर्वेक्षणाच्या अंतिम निकालासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे मनपा घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिकेने पडेगाव येथे १० एमएलडी, झाल्टा येथे ३५ एमएलडी, डॉ. सलीम अली सरोवर येथे ५ एमएलडी, कांचनवाडी येथील १६१ एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लॅन्ट (मलजल प्रक्रिया प्रकल्प) उभारले आहेत. ‘एसटीपी’मधून रोज सुमारे ६० ते ७० ‘एमएलडी’ पाण्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी नाल्यात सोडून दिले जाते.
पडेगाव, झाल्टा, डॉ. सलीम अली सरोवर, कांचनवाडी येथील एसटीपी प्लॅन्टच्या (मलजल प्रक्रिया प्रकल्प) कामाबद्दलही कौतुक करत त्यास ‘ओडीएफ ++’ (ODF ++) हे मानांकन देण्यात आले आहे. शहरातील ११ स्वछतागृहांपैकी ५ स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबद्दल महत्वाकांक्षी प्रकल्प तर अन्य स्वच्छतागृहास ‘स्वच्छता’ हा शेरा दिला आहे
‘ओडीएफ ++’म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत देशातील शहरे हगणदारीमुक्त व्हावीत, यावर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गतच शहरातील कोणत्याही भागात उघड्यावर लघवी किंवा शौच करताना कोणी आढळून येत नाही ना, याची तपासणी केली जाते. त्याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये व्यवस्थित कार्यान्वित असावीत, असाही निकष आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ 1.45 टक्के निधी
- ‘मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतेय’
- नव्या वर्षात आगीच्या घटना वाढल्या,जाणून घ्या महाराष्टात गेल्या महिनाभरात घडलेल्या दुर्घटनांबद्दल
- मुंबई जिंकण्यासाठी ‘कॉंग्रेसने’ कसली कंबर
- संतांचे दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावे लागतात – पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

