Share

संतांचे केवळ दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावेत-पंकजा मुंडे

Published On: 

बीड : गहिनीनाथ गडाची एक भक्त म्हणून दरवर्षी दर्शनासाठी गडावर येत असते. यात कधीही खंड पडू दिला नाही. संतांचे केवळ दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावे लागतात. वामनभाऊंचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणून कर्म केले तर पुण्य लाभते, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी वारकरी सांप्रदायातील थोर संत वैराग्यमूर्ती सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गडावर उपस्थित लावली. यावेळी त्यांनी वामनभाऊ महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, पालकमंत्री असताना सत्तेच्या माध्यमातून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी योगदान दिले. गडाची भक्त म्हणून यापुढेही योगदान देत राहू. गहिनीनाथ गडाची एक भक्त म्हणून दरवर्षी दर्शनासाठी गडावर येत असते. यात कधीही खंड पडू दिला नाही.

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतम मुंडे, पालकमंत्री धनजंय मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बजरंग सोनवणे, साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, सतिष शिंदे, जयदत्त धस यांच्यासह गडाचे वारकरी – टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!