Share

अवघ्या दीड तासांत संपला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा, कोणतीही नवीन घोषणा नाही

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. अवघ्या दीड तासात मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आटोपल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेथे तासभर चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शहर तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. यात सिंचन, जलसंधारण योजनांचाही समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणविषयक, शहरातील विकासकामे तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत होत असलेल्या कामांचा आढावा घेतला.

यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना शहर तसेच जिल्ह्यातील विकास कामाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवून कळवण्याचेही निर्देश दिले. यावेळी जिल्ह्यातील विकास कामांकरिता शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अजिंठा व वेरुळ या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवरील विकासकामांची माहिती घेतली.

दरम्यान, औरंगाबादेत मनपा निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नाही, परंतु सर्वच पक्षांनी त्या दिशेने तयारी सुरू केली आहे. यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री काही नवीन घोषणा करण्याची शहरवासीयांची अपेक्षा होती, मात्र असे काहीही घडले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तथापि, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी शहरात मनसेने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांच्या अंगावर पत्रके भिरकावली होती. औरंगाबाद नामांतरासाठी आक्रमक होत मनसेने मुख्यमंत्र्यांचेही वाहन अडवण्याचा इशारा दिल्याने, पोलिसांनी ही कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!