Share

तेलंगणातील भाजपा नेत्याला कारच्या डिक्कीत बंद करुन जिवंत जाळलं

Published On: 

🕒 1 min read

हैदराबाद – तेलंगणमधील मेडक जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका स्थानिक भाजपा नेत्याची अगदी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली. यामध्ये होरपळून या नेत्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी भाजप नेत्याला कारच्या डिक्कीमध्ये बंद केलं आणि त्यानंतर कारला आग लावली. ज्यात भाजपच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं व्ही. श्रीनिवास प्रसाद असं या नेत्याचं नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. या प्रकरणी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्थानिय सरकारी रुग्णालयात पाठवला. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मेडक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी सांगितले की काही अज्ञातांनी भाजपा नेत्याला त्यांच्या कारसह पेटवून दिले. आम्हाला कारच्या डिक्कीत प्रसाद यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!