🕒 1 min read
उस्मानाबाद- कोरोनाच्या संकटात लॉक़डाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली तसेच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास होते.
कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय जिथे दुग्धजन्य पदार्थांची गरज असते ते बंद आहेत परिणामी २० मार्च २०२० पासून पिशवी बंद दुधाचा खप ३० ते ३५ टक्के पर्यंत पर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री १०% ते१५% पर्यंत खाली आलेली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतक-यांना या संकटकाळी सावरण्याची गरज असून राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दुध प्रती लिटर ३० रु. दराने खरेदी करावे या मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे .
दरम्यान, राज्यातील दूध उत्पादक शेतकयांना गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान द्या, प्रती लिटर दुधाला तीस रुपये खरेदी दर द्या आणि दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रूपये अनुदान सोमवार २० जुलै रोजी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दूध भेट व भाजपा महायुतीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. राज्य शासनाने तातडीने दूध प्रश्नावर न्याय निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
आज रविवार १९ जुलै रोजी महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, रासपाचे महादेवराव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाई आठवले गटाचे अविनाशजी महातेकर, शिवसंग्रामचे विनायकराव मेटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. अनिलजी बोंडे, सुरेशजी हळवणकर तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी
छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
