जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. यात खर्डा साकत, चौंडी या प्रमुख गावांत आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व आहे. तरीही ४९ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायतीची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आहे. निम्म्याहून अधिक भाजपचे सदस्य निवडून आलेले आहेत’ असा दावा माजी मंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.
चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, ‘जामखेड तालुक्यात आपण केलेल्या विकास कामांच्या बळावरच एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये चार ग्रामपंचायती भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. तसेच भाजपाच्या विचाराचे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. विरोधकांनी विकासाच्या गप्पा मारल्या आहेत,’ असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
‘दादागिरी, गुंडागिरी हे शब्द विरोधकांकडून खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, दहा वर्षात आम्ही या गोष्टी कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत, मात्र सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियाच्या वेळी सदस्यांची पळवापळवी जर केली, तर जशास तसे उत्तर आम्ही देऊ,’ असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !
- प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, कडवे हिंदुत्ववादी होते – उर्मिला मातोंडकर
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- अधिकारी लोंढे यांच्यामुळे पूर्वीही एका ग्रामसेवकाने केली होती आत्महत्या
- घरी येणार असेल तर चांगले कपडे घालूनच ये; रहाणेच्या बायकोचा ‘स्वीट’ सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
