Share

प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, कडवे हिंदुत्ववादी होते – उर्मिला मातोंडकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्या शिवसेनेत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या आज पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘प्रबोधन’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात बोलताना त्यांनी प्रबोधनकार ठाकरेयांच्या व्यक्तिमत्वाचं, विचारांचं वर्णन आपल्या शब्दात केलं.

‘प्रबोधनकारांबद्दल दोन नाही, तर जास्त शब्दात बोलेन, कारण ते व्यक्तिमत्त्व अचाट आणि अफाट आहे. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि शिक्षणाची विलक्षण ओढ होती. ‘वाचाल तर वाचाल’ हे त्यांनी युवा पिढीला सांगितलेलं वाक्य मी नेहमी आचरणात आणते. हे वाक्य नेहमीच सत्य राहील’ असं मातोंडकर म्हणाल्या.

तर, ‘प्रबोधनकार ठाकरे हे अष्टपैलू होते. कट्टर सुधारणावादी, बहुजनांचे कैवारी, अस्सल सत्यशोधक, सामाजिक न्यायासाठी लढणारे निर्भीड नेते, प्रखर वक्ते, पत्रकार, नाटककार, इतिहासकार, संगीतकार, नट अशी त्यांची बहुविध रुपं होती. देव -वेद यांचं प्रामाण्य झिडकारणारे ते होते. बाबा आढाव यांनी सांगितल्याप्रमाणे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, तरी सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी. हिंदू धर्मावरील त्यांचं प्रेम, आस्था आणि श्रद्धा ही त्यांची ओळख होती. धर्मात सांगितलेल्या, मात्र बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते’ असं वर्णन देखील  उर्मिला मातोंडकर यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!