Share

कंडारी गावात दारुबंदीसाठी महिलांनी उपसरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले! पोलिसांनी केली सुटका

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: दारुमुळे अनेक जणांचे कुटुंब उध्वस्त झाले त्यातच कंडारी गावातील महिलांनी ही साखळी तोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अवैध दारु विक्री विरोधात महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी गावात दोघांच्या घरी धाड मारली. परंतु हाती काहीच न लागल्याने गावात उलट सुलट चर्चा सुरु होत आहे. याआधी कंडारी येथील महिलांनी सरपंच, ग्रामसेवक तसेच पोलीसांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, कंडारी येथे सहा जण अवैध दारू विक्री करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. महिलांनी केलेल्या मागणीला काही संघटनांनी पाठींबा दिला. यामुळे महिलांच्या आक्रमक भुमीकेमुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनीही अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने अंभी पोलिसांना दिले.

अवैध दारू विक्री होत असल्याने गावात तळीरामांची संख्या वाढत आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे गावातील दारू विक्री बंद करावी, अशी मागणी माहिलांनी या पूर्वीही केली होती. मात्र याकडे काना डोळा केल्याने गावातील संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी उपस्थित उपसरपंच व ग्रामसेवक यांना कार्यालयात कोंडून बाहेरुन कुलूप लावले.

कंडारी येथील महिलांनी अवैध दारु विरोधात घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आक्रमक आंदोलन करुन गावासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे, असे संतप्त महिलांची प्रतिक्रीया होती. दारु विरोधात ग्रामसेवक व उपसरपंचकडे तक्रार करुनही काही कारवाई झाली नाही त्यानंतर ग्रामसेवक व उपसरपंच यांनी आंबी पोलिसांना याची माहिती देत पोलिसांकडून स्वत:ची सुटका करुन घेतली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!