Share

दिल्लीतील स्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील चार ते पाच गाड्यांचे या स्फोटात नुकसान झाले. विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागले आहेत.

पोलिसांना इस्राएलच्या दूतावासाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्पेशल सेलला सापडले असून, 2 व्यक्तींना टॅक्सी सोडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीतून या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीत हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे या दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती.याचा बदला म्हणून हा स्फोट घडवण्यात आला का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!