🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेत बहुतांश सेवांचा समावेश करून गुरूवारपासून संचारबंदीचे आदेश जारी केले, या आदेशाच्या दुसऱ्यादिवशी बाजारपेठ कडकडीत बंद होती, परंतू अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांचा मुक्तसंचार सुरू होता. पोलिसांचा जागोजागी खडा पहारा होता, परंतू अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बहुतांश सेवांना परवानगी दिल्याने बाजारात फक्त दुकाने बंद होती, मात्र रस्त्यांवरील वर्दळ कायम असल्याने पोलिसांना फारसे काही करता आले नाही.
कडक संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गुरूवारी शहरात फेरफटका मारला असता जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. सराफा, नेहरूरोड, फुलबाजार, सुभाष रोड, बस स्थानक, शिवाजी पुतळा, मामाचौक, महावीर चौक, वीर सावरकर, चौक, टांगा स्टॅण्ड आदी भागांसह जुना जालन्यातील शनिमंदिर, गांधीचमन, मस्तगड, रेल्वे स्टेशन, नुतनवसाहत, कचेरी रोड, बाजार गल्ली आदी भागांमध्ये दुकाने बंद होती.
कोरोनाचा विळखा दिवसे न दिवस घट्ट होत असताना शासनाने लागू केलेली संचारबंदी आदेश कागदावर जरी असला तरी लोकांचा रस्त्यावर मुक्तसंचार सर्रास सुरू होता. अशा प्रकारे वर्दळीच्या संचारबंदीचा अनुभव पहिल्यांदाच येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. लोकांचा मुक्तसंचार सुरू होता. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक शहरात बिनधास्त शहरात फिरत होते. अत्यावश्यक सेवांना परवानगी असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला होता.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

