सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून पाच टी.एम.सी पाणी इंदापूरला दिल्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे, जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी २२ एप्रिल चा आदेश रद्द करत असल्याचे सांगत फक्त तोंडी घोषणा केली आहे.जलसंपदा विभागाकडून पाच टी.एम.सी पळवलेल्या पाण्याचा कोणताही आदेश रद्द झाल्याचे पत्र निघाले नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे इंदापूरला दिलेल्या पाण्याचा निर्णय रद्द केला जावा यासाठी बारामती येथे येत्या २६ तारखेला बुधवारी सकाळी ११ वा. देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या घरासमोर,गोविंद बागेसमोर खर्डा भाकर आंदोलन करणार असल्याचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश वनकळसे यांनी सांगितले .
याबाबत सविस्तर माहिती देताना नागेश वनकळसे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात उजनीवर अवलंबून असणाऱ्या जलसिंचनाच्या जवळपास सगळ्याच योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यायला हवे होते, उजनीचे सर्व पाणी वाटप पूर्ण झालेले आहे, धरणामध्ये पाण्याचा एकही थेंब शिल्लक नसताना सांडपाणी शब्दाच्या नावाखाली पाच टी.एम.सी पाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथे नेण्याचा जो प्रकार चालू आहे तो दुर्दैवी तर आहेच परंतु तो निर्णय रद्द करत असल्याचे नामदार जयंत पाटील यांनी सांगितले होते.त्याचे पत्र सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाले नाहीच उलटपक्षी उजनी जलाशयात नेमके किती पाणी येते हे तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली जाते याचा अर्थ स्पष्ट होतो की सोलापूरचे पाणी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून पळवले जात आहे.
त्यामुळे महाविकासआघाडी चे प्रणेते, देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या दारासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन खर्डा भाकर आंदोलन करणार आहोत, या आंदोलनाचा हेतू असा की, ज्या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ताटात पंचपक्वान्न येईल म्हणून उजनी जलाशयाची निर्मिती केली तो हेतू राज्यकर्त्यांनी सफल होऊ दिला नाही, शेतकऱ्यांच्या ताटात कायम खर्डा – भाकरी राहिली, म्हणून शेतकऱ्यांच्या गरिबीचं प्रतीक म्हणून बारामती येथे गोविंद बागेसमोर खर्डा भाकर आंदोलन करण्यात येत असल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.जेनेकरून खासदार शरद पवार यामध्ये न्याय करू शकतील.
यावेळी समन्वयक शिवाजीराव चव्हाण, प्रवक्ते बापूसाहेब काळे, उपाध्यक्ष नानासाहेब सावंत, सचिव महेश पवार, कार्याध्यक्ष बालाजी शेळके , प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब पवार ,युवा नेते हर्षल देशमुख, शहाजी केदार यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- जाणून घ्या दोन कोटी लसीकरणाचा महाराष्ट्र सरकारचा दावा फसवा आहे का ?
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावेत’


