Share

हरियाणात तीन शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना ट्रकखाली चिरडले

Published On: 

हरियाना: येथील बहादूरगडमध्ये पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या तीन आंदोलनकर्त्या महिलांना ट्रकखाली चिरडले असल्याची घटना येथे घडली आहे.

दरम्यान सकाळी सहा वाजेपासून झज्जर रोडवर फ्लायओव्हरखाली ही घटना घडली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या निर्धारीत रोटेशननुसार या महिला आंदोलनानंतर आपल्या घरी निघाल्या होत्या. या महिला रस्त्यावरील डिव्हायडरवर बसून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होत्या. यावेळी एका अनियंत्रित वेगानं येणाऱ्या ट्रकने या महिलांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी नागरिकांना रुग्णालयात हलवले आहे.

तर छिंदर कौर (६० वर्ष), अमरजीत कौर (५८ वर्ष), आणि गुरमेल कौर (६० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे आता देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!