Share

‘..तर मी राजीनामा तर देईलच पण राजकारणातून संन्यासही घेईल’ : नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली असल्याचा आरोप केला आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या जातीच्या मुद्द्यावरुन एक वेगळंच वळण लागलं आहे. वानखेडेंमुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी अनेक पुरावे दाखवले. मात्र समीर वानखेडे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबानी हे आरोप फेटाळून लावले. यानंतर मलिक यांनी मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर मी राजीनामा देईल आणि राजकारणातून संन्यास घेईल, आणि ते खोटे ठरले त्यांची नोकरी जाणार तर आहे पण किमान त्यांनी याबाबत माफी मागावी, असेही ते म्हणाले.

समीर वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले आहे. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समिती आली आहे त्यांनी चेक करावे. त्यात त्यांना काही सापडत नसेल तर जे वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वरसिंग माझ्याकडे येत असतील तर ते पुरावे द्यायला तयार आहे. माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान समीर वानखेडे यांचे मुस्लिम पध्दतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या अधिकार्‍याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.

मागच्या वर्षी दिपिका पदुकोण, साराअली खान यांना बोलावण्यात आले मात्र अटक करण्यात आली नाही. हे सर्व खोटं असेल तर त्यावेळी मिडियाने दाखवलेले फुटेज बघावे आणि त्या खोलात जाऊन चौकशी करा. मालदीव दौर्‍याकडे लक्ष द्या. त्यावेळी मालदीवमध्ये कोण कोण अभिनेता आणि अभिनेत्री होते हा सगळा खेळ समोर येईल असेही नवाब मलिक यांनी चौकशी समितीला माध्यमातून सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!