मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातलं आणखी एक वादग्रस्त नाव म्हणजे किरण गोसावी आहे. एनसीबीचे पंच म्हणून या सगळ्या कारवाईत त्यांचा सहभाग होता. तर शाहरुखकडून खंडणी मागण्यात देखील किरण गोसावींचा सहभाग होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. राज्यातही अनेक गुन्हे किरण गोसावींवर दाखल आहेत. यानंतर आता पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेकडून किरण गोसावीविरोधात कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे.
किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावीविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर यश मिळालं असून किरण गोसावीला अटक केली आहे.
पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपामुळं किरण गोसावी पुन्हा चर्चेत आले होते. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला एनसीबीचे पंच म्हणून किरण गोसावी यांनी कॉर्डिलिया क्रुझवर छापा मारला होता. त्याच छाप्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला होता. त्याच्या हाताला धरुन घेऊन येतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर किरण गोसावी एनसीबीच्या कोणत्याही पदावर नसताना, कारवाईमध्ये कसे होते? असा सवाल विचारला गेला. तेव्हापासून किरण गोसावी बेपत्ता झाले होता. मात्र अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडून चिन्मयने तीन लाख रुपये दिले. परंतु नोकरी न दिल्याने त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत
- बॉलिवूडचे बदनामीकारक चित्र रंगवलं जातंय; मुख्यमंत्री पाठवणार मोदींना पत्र
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप


