औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तशी तयारी देखील करण्यात येत आहे. त्यातच लॉकडाऊन उघडण्यात आल्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. त्यामुळे गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात एम.डी. मेडिसिन डॉक्टरांची उपलब्धता करावी तसेच लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याची मागणी आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त रुग्ण संख्या दिसून आली. औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी भागातील लॉकडाऊन पूर्णपणे उघडले असले तरी ग्रामीण भागात अद्याप रुग्ण संख्या जास्तच आहे. अशा परिस्थितीत तिसरी लाट आल्यास ग्रामीण भागात जास्त धोका दिसून येतोय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू करण्याची मागणी आमदार बोरनारे यांनी केली आहे.
कोरोना संबंधी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या वेळी आमदार बोरनारे यांनी ही मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी भागातील रुग्ण संख्या ५० च्या आत असली तरी ग्रामीणमध्ये अद्यापही १०० पेक्षा जास्त रुग्ण दररोज भरती होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची मागणीही आमदार बोरनारे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाला राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्याची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले पत्र
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
