🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही. तसेच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं. असे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजप तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच फडणवीसांच्या नोटासंबंधी केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू’, असे आव्हानही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
- “अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध
- “पवार साहेबांवर वैचारिक उंचीची टीका करा, असली बालीश विधाने…”,चाकणकरांचे विरोधकांना आव्हान
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक, नाव आणि प्रोफाईल फोटो बदलला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
