Share

मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : महापालिकेच्या पे आणि पार्किंग योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. असा पालिकेतील विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे. यामुळे मुंबई पालिकेचे (Mumbai Municipal Corporation) नुकसान झाले आहे. मुंबई मनपाच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी केला होता. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार महाविकास आघाडीतील मित्रपक्षच उघडकीस आणत असतील तर याचे गांभीर्य वेगळेच ठरते. असे भातखळकर म्हणाले आहेत.

भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबई मनपाच्या ‘पे अँड पार्क’मध्ये १०० कोटींचा घोटाळा’, असा आरोप काँगेसच्या रवी राजा यांनी केला आहे. महा विकास आघाडीतील मित्रपक्षच जर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीला आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच ठरते.’, असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.

मुंबई शहरात जवळपास २५० पार्किंग सेंट्रल एजन्सी आहेत. ५०० पे आणि पार्किंग ठिकाणं आहेत. यातून मनपाला दरवर्षी शंभर कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यातून आपले खिशे भरत आहेत. यामुळे मुंबई महापालिकेला करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!