Share

“अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका

Published On: 

मुंबई: १२ आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच होत असल्याचे म्हणत कोणत्याही आमदारांना ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करण्याचा सभागृहाचा अधिकार नाही,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते आमदार पराग शाह (BJP MLA Parag Shah) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

‘जनतेचे प्रश्न मांडले म्हणून अहंकारी राज्य सरकारने १२ आमदारांना असंविधानिक पध्दतीने १ वर्षासाठी निलंबित केले होते. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सणसणीत चपराक लावली आहे. अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकारने पुन्हा एकदा तोंडघशी पडून दाखवले!’ असे ट्वीट करत पराग शाह यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान निलंबन ही त्या आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली शिक्षा आहे. आज १२ आहेत. उद्या १२० असतील. लोकशाहीमध्ये हा चुकीचा पायंडा पडू शकतो आणि त्यामुळे लोकशाही मूल्यासोबत तडजोड होण्याचा मोठा धोका आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!