Share

संकटात भर ; पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

Published On: 

रायगड : महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकटाने कल्लोळ माजवला आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आता पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड काेसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जखमींना पोलादपूर आणि महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तसेच पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गावातील 13 जखमींना महाड आणि पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी डोंगर उतारावर आणि पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मी गेल्या चार पाच दिवसांपासून घेत आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीला काही मर्यादा राहिलेली नाही कारण अतिवृष्टीच्या पुढची वृष्टी होत आहे. अनपेक्षित असं हे संकट आहे. दरडी कोसळताहेत, पुराचे पाणी वाढतंय, नद्या फुगताहेत आणि या संकटाला आपण सामोरे जात आहोत.

या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांचा फोन आला होता. सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यानुसार आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड आणि एनडीआरएफच्या टीम मदत कार्यात उतरली आहे. आपापल्या परीने मदत आणि बचावकार्य करत आहेत. काही ठिकाणी नद्यांना आलेला पूर आणि धरणांचे पाणी सोडावे लागत असल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!