कोलकत्ता : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे देशात संसर्गाचा धोका वाढला आहे.
निवडणूक निकालांपेक्षाही अधिक चिंता कोरोना विषाणूचे थैमान आहे. पश्चिम बंगालमधून त्यातच एक दुर्दैवी बातमी आली आहे. तिथल्या खरदह मतदारसंघात आघाडीवर असलेले तृणमूल कॉंग्रेसचे नेते नेते काजल सिन्हा यांचं रविवारी सकाळीच कोरोनामुळे निधन झाले आहे.
काजल सिन्हा यांना २१ एप्रिल रोजी कोलकात्याच्या आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २२ एप्रिलला खरदह मतदारसंघात मतदान झालं. त्या दिवशी काजल सिन्हा रुग्णालयातच होते. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रविवारी २५ एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वास्तविक मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी आघाडी घेतली. ते विजयाच्या अगदी जवळ असल्याचं समजतं. काजल सिन्हा यांचे मतदानानंतर कोरोनामुळे निधन झाले. अशा परिस्थितीत जरी सिन्हा जिंकले तरी ही जागा रिक्त मानली जाईल.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. ते सध्या ५ जागांवर आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या’
- निवडणूक निकालांपेक्षा लोकांचे जीव वाचणे महत्वाचे : कपिल सिब्बल
- सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक टी २० सामना’
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


