Share

बीडच्या शिरुर नगरपंचायतीत काँग्रेस उमेदवाराला मिळाले चक्क शून्य मत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: नुकत्याच राज्यामध्ये नगरपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र बीड शिरूर नगर पंचायतीत काँग्रेसच्या एका उमेदवाराला चक्क शून्य मतं मिळाले आहेत. फकीर शब्बीर बाबू(Fakir Shbabeer Babu) असे उमेदवाराचे नाव आहे. अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. एका मताच्या फरकाने अनेक जण निवडून येऊ शकले नाहीत. मात्र शून्य मते पडल्याची घटना दुर्मिळच म्हणावी लागेल.

राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. बुधवारी निकाल लागल्यानंतर राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांची रणधुमाळी पहावयास मिळाली. भाजप तसेच महाविकास आघाडीकडून आपणच राज्यात नंबर १ ठरल्याचा दावा केला जात आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शून्य मत मिळवलेल्या काँग्रेसच्या शब्बीर बाबू या उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू आहे. बीडमध्ये नेहमीच भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळते. यामागे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातच नेहमी लढत असते.

बीड जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था फार काही बरी नाही. या ठिकाणी केज नगरपंचायत सोडल्यास इतर ठिकाणी काँग्रेस नाहीच. नुकत्याच लागलेल्या निकालात बीड जिल्ह्यात काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आहे. बीड जिल्ह्यामध्ये पाच नगरपंचायतींसाठी मतदान झाले. आणि त्यात मोठ्या प्रमाणावर गाजली ती शिरूर नगरपंचायत. राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली मात्र भाजपने याठिकाणी सत्ता काबीज केली. मात्र या ठिकाणी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे शब्बीर बाबू या उमेदवाराला एकही मत मिळवता आले नाही. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शब्बीर बाबू यांना शिरूर या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. वॉर्ड क्रमांक ६ मधून त्यांनी निवडणूक लढवली. १९८ जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावला. उमेदवाराला याठिकाणी १५५ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार होता. त्यांनी ४३ मते मिळवली. मात्र काँग्रेस उमेदवार एकही मत मिळवू शकले नाहीत. शब्बीर यांचे स्वतःचे ही मतदान दुसऱ्या वॉर्डात असल्याने ते स्वतः देखील स्वतःला मतदान करू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला मात्र भोपळा आला आहे. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा हशा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!