Share

बीडमध्ये ८९४ जण रेमेडेसिवीरच्या प्रतीक्षेत, मिळाले फक्त २४०

Published On: 

बीड: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना उन्हात दिवसभर नोंदणी साठी रांगेत उभे राहावे लागायचे मात्र तरीही इंजेक्शन काही मिळत नव्हते. सध्या बीड मध्ये एकूण दीड हजार इंजेक्शनची गरज असताना मागच्या दोन दिवसात केवळ २४० इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले आहेत.

कंपन्यांकडे पुरेसा साठा नसल्याने जिल्ह्यात दोन दिवसांत एकही रेमडेसिविर इंजेक्शन मिळू शकले नाही. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी जिल्हा रुग्णालयाकडून उधारीवर शंभर इंजेक्शन मिळाल्याचा पहिला आदेश काढला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तीन वाजता १४० इंजेक्शन उपलब्ध झाल्याचा दुसरा आदेश काढला. या आदेशातील इंजेक्शनच्या अटी किचकट असल्याची टीका होत आहे. जिल्ह्यात दीड हजार इंजेक्शनची मागणी असताना २ दिवसांत फक्त २४० इंजेक्शन उपलब्ध झाले. एकट्या बीड शहरात तीन दिवसांपासून नोंदणी केलेले ८९४ जण अजूनही रेमडेसिविर मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बीडमध्ये शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडेसिविर मिळवण्यासाठी नातेवाइकांनी दि. २४ एप्रिलपासून बीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज दाखल केलेत. बीड वगळता अन्य तालुक्यामध्ये तहसील कार्यालय स्तरावर रेमडेसिविरसाठी अर्ज देण्याची व्यवस्था केलेली आहे. बीड शहरात तीन दिवसांत ८९४ जणांनी अर्ज केले असून त्यांना अजूनही रेमडेसिविर मिळाले नाही. तर जिल्ह्यात २५ व २६ एप्रिल रोजी अर्ज करूनही रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर मिळाले नाहीत.

केज तहसीलदारांनी रेमडेसिविरच्या नोंदणीसाठी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. २६ पासून तहसील कार्यालयात नोंदणी सुरू झाली. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत रेमडेसिविरसाठी कुणीही नोंदणी केली नसल्याची माहिती अव्वल कारकून जब्बार पठाण यांनी दिली. तर पाटोदा तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारपर्यंत एकही मागणीचा अर्ज आला नाही. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत पाटोद्यात नोंदणीसाठी कुणीही आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!