Share

‘लाख नव्हे कोटी रुपयांचा खेळाडू बनुन दाखव’ …अन् दिल्लीच्या ‘या’ खेळाडूने द्रविडचे शब्द खरे केले

Published On: 

अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात दिल्लीच्या आवेश खानने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या आवेश खानला आयपीएल २०१६मध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही. यावेळी निराश आवेश खानला भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने १० लाख नव्हे तर कोट्यावधी रुपयांची कमाई करणारा खेळाडू बनुन दाखव. असे म्हणत त्याला प्रेरणा दिली. यानंतर २०१७ साली आरसीबी संघाकडून आवेशने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढील हंगामात दिल्लीने ७० लाखांची किंमत मोजुन आपल्या ताफ्यात सहभागी केले.

यंदाच्या स्पर्धेत त्याने सलामीच्या सामन्यापासुन आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. सलामीच्या सामन्यात त्याने महेंद्रसिंह धोनीला तंबुत धाडले होते. तर मंगळवारी झालेल्या सामन्यात त्याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. आवेश खानने २०२१ आयपीएलमध्ये ६ सामन्यात एकूण १२ गडी बाद केले आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!