Share

राज्य सरकारच्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत, चंद्रकांतदादांनी दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचं लसीकरण राज्य सरकारमार्फत केलं जाणार आहे. याचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असून लसीकरणाच्या खर्चासाठी ६५०० कोटी रुपये सरकारतर्फे खर्च करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मे रोजी राज्यात सुरु करण्यात येणार नसून लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरण सुरु केलं जाईल’ असं देखील राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाचं भाजपने स्वागत केलं आहे. ‘राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यासोबतच, ‘कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.’ असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ‘जनतेला मी आवाहन करतो की, कोरोनाच्या या लढाईत लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करा. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!’ असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!